Wednesday, 6 June 2012

पाऊस , पाऊस कविता , पहिला पाऊस ,Marathi kavita Paus


  पाऊस कविता  , Marathi Kavita Paus 


नोट : कवी चे नाव माहित नसल्यामुळे  कवितेच्या  खाली  कुठल्याही व्यक्तीचे नाव दिलेले नाही , हे वाचकांनी लक्ष्यात ठेवावे . खरा कवी कोण कळला किंवा आपल्याला माहित असल्यास कृपया संपर्क साधावा , आम्ही उपकृत होऊ.


paus marathi kavita

 पाऊस...पाउस ...त्यातल्या त्यात प्रत्येक जन आतुरतेणे वाट पाहतो तो पहिला पाऊस ....पाऊस  पडतो ..बरसतो ...त्यावेळी वातावरनात एक वेगळाच सुगंध असतो .. तो  आल्हाददायक गारवा ...थंडगार हवा ....प्रत्येकजन जणू काही वेगळ्याच धुंदीत असतो...काही जन आपल्या भावनांना कवितेच्या माध्यमातून वाट करून देतात ...तर मित्रानो इथे आपल्यासाठी मराठी पाऊस  कविता किंवा Enjoy पहिला पाऊस !!! 

पाऊस कविता , marathi kavita paus : 1

पहिल्या  पावसाचा ..भास पावलांचा पाउस दाटलेला  माझ्या घरावरी हा ,

दारास भास आता हळुवार पावलांचा . 

गवतास थेंब सारे बिलगून बसलेले ,
निथळून साचलेले तळवा भिजेल आता हळुवार पावलांचा .

झाडावरून पक्षी सारे उडून गेले ,
जेव्हा भिजून गेले पंखात नाद त्यांच्या हळुवार पावलांचा . 

पाउल वाट सारी रात्री भिजून गेली ,
विसरून तीच गेली ओला ठसा कुणाच्या हळुवार पावलांचा .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

ये रे ये रे पावसा रुसलास का?

माझ्याशी गट्टी फु केलीस का ?

किती गोड हे गाणे ... मी १०० % खात्री देतो , तुम्ही एक वेळेस ऐकलात  तर सतत Replay  कराल हे गाणे .... 

काही दिवसापूर्वी सहजच माझ्या ऐकण्यात आलेले हे गाणे ... आणि त्या बरोबरच सगळे बालपण डोळ्यासमोर आले .... ते शाळेतील दिवस...पाऊस आल्यानंतर  शाळेत जाताना उडालेली ती धांदल ... मधल्या  सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा ... घरी जाताना मुद्दाम  हळुवार चालत जाणे ....

रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!!!

 हे गाणे ऐकताना  आपण नक्कीच आपले बालपण आठवाल  आणि मनातल्या  मनात स्मित हास्य कराल....

( Dedicated   to all my school friends,  doesnt matter today whether we are in contact or not ... @ you are alwayz part of my old unforgettable Memories )


-----------------------------------------------------------------------------------------------------------------


पाऊस कविता , marathi kavita paus : 2

खऱ्या  पावसाने कुठे जायचे ?


पुन्हा पावसालाच सांगायचे 

कुणाला किती थेंब वाटायचे ,

मऊ कापसाने दरी गोठली 
ढगांनी किती खोल  उतरायचे ,

घराने  मला आज  समजावले 
भिजुनी घरी रोज परतायचे ,

तुझी आसवे पाझरू लागता 
खऱ्या  पावसाने कुठे जायचे ?

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

पाऊस कविता , marathi kavita paus : 3


खूप पाऊस पडतो  तेव्हा कोणाला काय वाटते ..


शिशुवर्गातील मुलाला :
मोठ्या मोठ्या ढगांनी वाटत , अगदी खाली यावं
ढगालाच तोंड लाऊन त्यातल पाणी पिऊन घ्यावं .

पहिलीतील मुलाला  :
खूप पाऊस पडतो तेव्हा वाटत , रस्त्याची  नदी व्हावी 
दफ्तरच होडक करून तिला पार करून जावं.


चौथीतील  मुलाला :
कोसळत असतो पाऊस तेव्हा वाटत मला वीज व्हावं 
मला त्रास देणाऱ्यांच्या कानाजवळ कडाडाव.

आठवीतील मुलाला :
वह्या पुस्तक हातामधली  आईन येऊन  काढून घ्यावीत 
गरमागरम कांदाभजी तिन मला खायला द्यावीत .

कॉलेजकुमार :
भिजण्यासाठी गच्चीत जावं , समोरच्या गच्चीत ती असावी 
दोन्ही गच्च्यांमध्ये तेव्हा आणखी कोणीच  माणस नसावी .

म्ध्यवयीन गृहस्थ :
गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी घ्यावी 
पोर जावीत पावसात भिजायला , अन बायको तेव्हा लाडात यावी . 

वृधस्थ  गृहस्थ : (वय : ८५ वर्षे  )
वाटत , तुंबलेल्या पाण्यात बुडून मरावं
जगण्यात आता राहील काय ?


-----------------------------------------------------------------------------------------------------------------

पाऊस कविता , marathi kavita paus : 4

पाऊस कधींचा  पडतो 


झाडांची  हलती पाने 
हलकेच  जाग मज  आली 
दु : खाच्या मंद सुराने || धृ ||

डोळ्यांत   उतरले पाणी
पाण्यावर डोळे  फिरती 
रक्ताचा उडाला पारा
या नितळ उताणीवरती || १ ||

पेटून कशी उजळेना 
हि शुभ्र फुलांची ज्वाला 
ताऱ्याच्या  प्रहरापाशी 
पाऊस असा कोसळला || २ ||

संदि:ग्ध  घरांच्या ओळी 
आकाश ढवळतो  वारा
माझ्याच किनाऱ्यावरती 
 लाटांचा  आज पहारा || ३ ||


-----------------------------------------------------------------------------------------------------------------