Marathi kavita / मराठी कविता
Marathi prem Kavita : 1
खरेच आज प्रेम किती महाग झाले आहे?
हल्ली संध्याकाळी केवळ
गजरा आणुन चालत नाही
"De Beers" च्या डायमंड शिवाय
गालावर खळी खुलतच नाही!
चौपाटीवर फ़िरुन केवळ
तीचे मन आता रमत नाही
"बरिस्टात" पैसे मोजल्याशिवाय
प्रेमाची नजर मिळतच नाही!
रातराणीचा मंद दरवळ
आता तिला जवळ ओढत नाही
'चार्ली' नी 'ब्रुनो' फ़वारल्या शिवाय
रुसलेली कळी फ़ुलतच नाही!
खरच, प्रेम किती महाग झालय नाही?
-------------------------------------------------------------
Marathi prem Kavita : 2
Marathi kavita : तुझी आठवण
तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते,
हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा देउन जाते..
तुझ्या पैजणांची रुणझुण
कानांमध्ये दाटुन येते,
मी मिटुन घेतो डोळे तेव्हा
तु मिठीत हळुवार भेटुन जाते...
स्वप्नांतले जगणे माझे
वास्तवाचे भान सुटुन जाते,
मनात तुझ्या आठवांचे
पुन्हा रान पेटुन येते....
तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते..,
हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा... देउन जाते.....
-------------------------------------------------------------
Marathi prem Kavita : 3
आज
मी त्याच्या wall वर गेले होते ...............
जुन्या
आठवणी कशा सरकन डोळ्यासमोरून गेल्या ...........
आकाशतल्या
विजेप्रमाणे हृदयात कडाडल्या .,..........
तू
तुज्या नवीन मित्र मैत्रिणी मध्ये खुश आहे बघून चांगले वाटले .,........
I got a spcl persn in lyf,.............
...
स्टेटस वाचून आभाळच कोसळले .,............
तुजे
ते gud mrning,gud nyt कमेंट करणे ..................
तुज्या
स्टेटस मध्ये फक्त माजे माजेच ते असणे ................
तुज्या
स्टेटस ,तुज्या कमेंट्स ,तुज्या likes ला मी फसणे.................
सारे
सारे काही आठवले विनाकारणच माज्याशी बोलणे बंद करणे .............
पण
ती wall सांगत होती ...........
माज्यासाठी
आता तिथे no entry आहे .............
कारण
फसवायला आता तुला नवीन मुलगी सापडली आहे .........
माज्या
तुज्या sts,cments,pokes,likes च्या दुनियेतunfriend कधी झाले कळलेच नाही ..
माज्या
तुज्या नात्यात block कधी आला कळलच नाही .............
-------------------------------------------------------------
Marathi prem Kavita : 4
कधीतरी एकतर्फे प्रेम करुन बघा.....!
नाही केले काही आपल्या साठी तिने
तरी तिच्यासाठी काही तरी करुन बघा....!
तिच्या साठी आपले जीवन काही नाही पण
तिच्या साठी जगुन बघा....! आपल्या शब्दाला किंमत
... नाही पण तिच्या शब्दाला किंमत द्यायला शिका......!
आपले अश्रु म्हणजे पानी पण
तिच्या अश्रुना मोती म्हणायला शिका ....! एक तर्फे
का होई ना पण जिवापाड प्रेम करून बघा ....!
-------------------------------------------------------------
Marathi Kavita : 5
Marathi love poems : प्रेम म्हणजे काय ??
एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून म्हणाला..
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो
जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो
तू विचार फक्त माझाच करतो
कारण मी पूर्णपणे तुझाच असतो
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो
प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार असतो
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो
आयुष्य खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो
प्रेम म्हणजे काय?
-------------------------------------------------------------
Marathi Kavita : 6
हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत..
चारचौघात एकट बसण्यापेक्षा
... कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत….
-------------------------------------------------------------
Marathi Kavita : 7
ही कवीता फॉरवर्ड करा, नाही तर पाप येईल
रात्री झोपल्यानंतर, तुमच्या घरात साप येईल
पाच जनांना फॉरवर्ड करा, हरवलेली वस्तू सापडेल
नाही केली तर, भूत तुम्हाला कानाखाली झापडेल
दहा जनांना फॉरवर्ड करा, सोन्याचा हार मिळेल
नाही केली तर, पाठीवर चोप बेसुमार मिळेल
पंचवीस जनांना फॉरवर्ड करा, स्टॉक मार्केट वर चढेल
नाही केली तर, कावळ्याचे शिट डोक्यावर पडेल
पनास जनांना फॉरवर्ड करा, नोकरीत प्रमोशन होईल
नाही केली तर, सकाळ संध्याकाळ लुज मोशन होईल
शंभर जनांना फॉरवर्ड करा, लॉटरी मिळून जाईल
नाही केली तर, बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाईल
----------------------------------------------------------------------
Marathi prem Kavita : 8
मराठी मुलगा कविता : on the facebook
फासिबूक वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना वाल (प्रेमाने) शिवी घालुन,
मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो ,
तो मुलगा मराठी असतो...
ऑनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो...
मेल FWD अनेक मुले करतात,
पण जो मुलींना embarassing वाटेल असे कही FWD करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...
चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,
पण जो 'I Respect your Privacy'म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...
Virtual चाट फ्रेन्डस अनेक मुले असतात,
पण जो 'Whts Real,Virtual ?..Friends Are Forever'असे म्हणतो,
तो मुलगा मराठी असतो...
(आता तर आयडी द्या मग )
----------------------------------------------------------------------
Marathi prem Kavita : 9
साथही तुझी हवी आहे मला
फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे
शांत स्थळी एकांतवेळी
प्रीत तुझी हवी आहे
शृंगार प्रेम नको मला
वात्सल्य प्रेम हव आहे
सांजवेळी सूर्यास्ताला
प्रेमगीत हव आहे
दवबिंदू नकोत मला
रिमझिम पाऊस हवा आहे
रानफुलाला सुखावणारा
गार वारा हवा आहे
फक्त शब्द नकोत मला
अर्थ त्यातला हवा आहे
तिमिरातून तेजाकडचा
मार्ग त्यातून हवा आहे
सृष्टी सारी नको मला
द्रुष्टी तुझी हवी आहे
तुझ्या डोळ्यात दिसणारा
विश्वास मला हवा आहे
तुझा दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे
खचनाऱ्या माझ्या मनाला
आधार तुझा हवा आहे
क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवा आहेस
वेळ तुझी नको मला
वेळीस तू हवा आहेस
----------------------------------------------------------------------