Wednesday, 24 July 2013

90 चा दूरदर्शन आणि आपण

90चा दूरदर्शन आणि आपण 

 

durdarshan aani apan

 1.रविवारी सकाळी अंघोळ करून टीव्ही समोर बसायचो 


2."रंगोली" मधल्या जुन्या नवीन गाण्यासाठी वाट बघायची 

3."जंगल-बुक" बघण्यासाठी सगळे मित्र मंडळी घरी जमायची 

4.शक्तिमान बघण्यासाठी पळत पळत येऊन टीव्ही समोर बसायचं 

5.महाभारत चालू होताच घरातले सगळे एकत्र जमायचे 

6."चंद्रकांता" पाट्या पासून सेवट पर्यंत बघायचं 

7. चंद्रकांता चा शेवट सस्पेन्स असायचा आणि आपण आठवडाभर याचा विचार करत बसायचो 

8.शनिवार आणि रविवार च्या पिक्चर ची वाट बघत बसायची 

9.कोण जर नेता मेला आणि नेहमीच्या सिरीयल लागल्या नाहीत तर त्या नेत्याला मनापासून शिव्या घालायच्या 

10.सचिन आउट झाल्यावर ब्याट-बॉल घेऊन गप बाहेर खेळायला जायच

11."मूक-बधिर" समाचार लागले कि त्यांची नक्कल करायची 

12. हवने ऐन्टेना हलला तर त्याला छतावर जाऊन हलवत बसायचं ..

पुन्हा ते दिवस येतील का....